Saturday, September 14, 2019

Words by Sarthak | Poems | Marathi Poem | Marathi Kavita |

मनाची भटकंती

रानावनात साऱ्या, मन माझे बागडले
शहरातील मुके पक्षी, रानी मज सापडले
पुन्हा तिच गुंज, माझ्या कर्णांनी अनुभवली
डोळ्यातील आसवांनी पापणी मात्र लवली
फुलावरती मधमाशी ओशाळून बसली
कोळ्यानं कौशल्यानं जाळी सुरेख विणली
गोंडस ते हरिणीचं इवलसं पाडस
शेपटीवर लटकण्याचं वानराचं धाडस
गजबजलेलं रान स्मरणात कायम राहिल
मनातील कोपऱ्यात जागा करुन राहिल


- सार्थक...
(info.sarthakfeeds@gmail.com)

No comments:

Post a Comment